Tue. Aug 9th, 2022

राऊतांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाने संजय राऊत यांना ईडी कोठडी सुनावली असून गुरुवारी याप्रकरणी सुनावणी झाली. दरम्यान, संजय राऊतांच्या ईडी कोठडीत वाढ झाली असून 8 ऑगस्टपर्यंत राऊतांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊतांना दिलासा मिळालेला नाही.

संजय राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स बजावले  होते. त्यानुसार ईडीने 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली होती. त्यामुळे गुरुवारी राऊतांना न्यायालयात हजर करण्यात आले. संजय राऊत चौकशीत सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीने न्यायालयात केला. त्यामुळे संजय राऊतांच्या चौकशीसाठी अधिक वेळेची मागणी ईडीकडून न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार गुरुवारी सनुावणी पार पडली असून न्यायालयाने राऊतांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे संजय राऊतांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला असून त्यांना 8 ऑगस्टपर्यंत कोठडीतच रहावे लागणार आहे. तसेच पुढील आठवड्यात राऊतांना चौकशीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

न्यायालयात ईडीचा युक्तिवाद

 • रोख रकमेचा तपशील मिळाला – ईडी
 • राऊतांना प्रवीण राऊत यांच्याकडून महिन्याला रकम मिळायची – ईडी
 • संजय राऊतांची उत्तर समाधानकारक नाही – ईडी
 • राऊतांच्या घरातून महत्वाची कागदपत्रं मिळाली – ईडी
 • सोमवारपर्यंत इतर आरोपीची चौकशी करू – ईडी
 • राऊतांना दरमहिन्याला ठराविक रक्कम मिळायची – ईडी
 • वर्षा राऊतांनी अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवले – ईडी

न्यायालयात राऊतांच्या वकिलांचा युक्तिवाद

 • नव्या रिमांडमध्ये आणखी दोन आरोप – राऊतांचे वकील
 • अलिबागच्या जमिनीबाबत उल्लेख नाही – राऊतांचे वकील
 • ‘राऊतांना जवाब नोंदवण्यासाठी धमकावलं जातंय’ – राऊतांचे वकील
 • यावर, राऊत अटकेत असताना त्यांना कसं धमकवण्यात आलं?, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे.
 • राऊतांविरुद्ध राजकीय षडयंत्र – राऊतांचे वकील

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.