Thu. Sep 29th, 2022

रवीना टंडनचा खुलासा

अभिनेत्री रवीना टंडनने ही 90 च्या दशकातील दमदार अभिनेत्री होती. फार कमी वयात रवीनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तितक्याच लवकर तिला प्रसिद्ध देखील मिळाली. रविनाच्या अभिनयाने चाहत्यांवर भुरळ घातली होती. 90 च्या दशकातील बोल्ड आणि ग्लमरस अभिनेत्री अशी ओळख ही रवीनाने बॉलिवूडमध्ये बनवली शिवाय अनेक सिनेमांमधून विविध भूमिकाही तिने साकारल्या होत्या. रवीना ही सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. नुकतच रवीनाने एका मुलाखतीत बॉलिवू़डमध्ये ही निगेटिव्ह लोक असल्याचं म्हटलं आहे आणि आता काही लोक निर्माते झाल्यानं कलाकारांना आपल्या तालावर नाचवतात असंही रवीनाने सांगितलं. तिने सोशल मीडियावरील ट्रोल करणाऱ्यांबद्दल तिचं मत मांडलंय. रवीना म्हणाली, ” सोशल मीडियामुळे अनेकापर्यंत पोहचता आलं, लोकप्रियता मिळाली. मला वाटतं हे एक वरदान आहे. मात्र बऱ्याचदा ट्रोल आणि निगेटिव्हीटीमुळे तो एक अडथळा वाटू लागतो. आम्हाला अनेकदा अशांचा सामना करावा लागतो. एवढचं नाही बऱ्याच लोकांमध्ये इतकी नकारात्मकता भरली आहे जे आता निर्माते झाले आहेत आणि अनेक कलाकारांना आपल्या तालावर नाचवत आहेत. असे लोक आजही आसपास आहेत मात्र मी त्यांच्यापासून दूरच राहण्याचा प्रयत्न करते.” रवीनाने म्हटलं की, सोशल मीडियावरील ट्रोल करणाऱ्यावर मी लक्ष देत नाही. मी त्यांना माझ्या आयुष्यातून बाजूला काढून टाकलंय आणि हेच उत्तम आहे असं मला वाटतं. माझ्या मते आपण कायम सकारात्मक विचार करणाऱ्यांसोबत राहणं गरजेचं आहे. जे तुमच्यासाठी चांगले आहेत आणि स्वत:साठी देखील.” तसेच रवीनाने एका पुरस्कार सोहळ्यासाठी गोव्याला जाणं देखील यादरम्यान टाळलं आहे. ती म्हणाली सध्या आपण आरोग्य सेवेत काम करणाऱ्यांसाठी मदत करणं गरजेचं आहे. रवीना लवकरच ‘केजीएफ-2’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रवीना ही सुप्रसिद्ध अभिनेता यश याच्यासोबत पडद्यावर दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.