Fri. Oct 7th, 2022

रवी राणांचे शाईफेक प्रकरण सीआयडीकडे वर्ग

अमरावती महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाईफेक प्रकरणातील तपासाला आता वेग आलाय. अमरावती शाईफेक प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. आता तपास सीआयडी करणार आहे. शाईफेक प्रकरणात आमदार रवी राणा सह ११ जणांवर गुन्हा दाखल आहेत. रवी राणा यांची जामिनावर सुटका झाली होती. आता या प्रकणाच्या तपासाला वेग आला आहे.

काय आहे प्रकरण?

अमरावतीमध्ये राजापेठ उड्डाणपूल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यात आला होता. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे काही जणांना स्वतःला शिवप्रेमी म्हणत मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकरांच्या अंगावर शाही फेकत निषेध व्यक्त केला होता. १२ जानेवारीला आमदार रवी राणा यांनी महापालिकेच्या परवानगीशिवाय राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता.

त्यानंतर रातोरात शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूरमध्ये पेट्रोलपंप चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. त्यानंतर रवी राणा यांच्याकडून बसवण्यात आलेला पुतळा महापालिकेने हटवला होता. त्यामुळे संतप्त झालेल्यांना आयुक्त आष्टीकर यांच्यावर शाईफेक केली होती. त्यात रवी राणा यांच्यांसह आणखी बारा जणांविरोधात आष्टीकर यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यानंतर रवी राणा यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.