Jaimaharashtra news

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची पुनर्नियुक्ती

रवी शास्त्री यांची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य कपिल देव यांनी ही माहिती दिली आहे. यांच्या निवडीबद्दल अनेकांना उत्सुकता होती. क्रिकेट सल्लागार समितीने पत्रकार परिषद घेवून ही माहिती दिली आहे. त्यांची दोन वर्षासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत रवी शास्त्री?

रवी शास्त्री हे जुलै 2017 पासून टीम इंडियाचे प्रशिक्षक असून २०२१ मध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपपर्यंत ते प्रशिक्षकपदी राहणार आहेत. रवी शास्त्रींच्या काळात भारतीय टीमने 13 कसोटी सामने जिंकले आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात 36 पैकी 25 सामने जिंकले आहेत. रवी शास्त्री वगळता रॉबिन सिंह, लालचंद राजपूत यांनीही भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता.

 

माजी क्रिकेटपटू कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांनी ही पत्रकार परिषद घेवून ही माहिती दिली. कपिल देव यांनी शास्त्री यांच्या नावाची घोषणा केली आहे. “भारतीय संघासाठी आम्ही परदेशी प्रशिक्षक नियुक्त करण्याच्या विचारात नाही आहोत. गॅरी कस्टर्न सारख्या दिग्गज खेळाडूंनी या पदासाठी अर्ज केला आहे, अशा नावांचा आम्ही विचार करु मात्र भारतीय प्रशिक्षक हीच आमची पहिली पसंती राहील. असं समितीने म्हटलं होतं त्यामुळे रवी शास्त्रींच्या नावाची चर्चा होती.

Exit mobile version