Sat. Jul 31st, 2021

Icc Odi Rankings : बुमराहने पहिलं स्थान गमावलं, जडेजा चमकला

न्यूझीलंडने टीम इंडियाचा मंगळवारी झालेल्या तिसऱ्या वनडेत पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने टीम इंडियाला जशास तसे उत्तर दिले.

न्यूझीलंडने व्हॉटवॉशचा बदला व्हाईटवॉशने घेतला. न्यूझीलडंने टीम इंडियाचा वनडे सीरिजमध्ये ३-० असा एकतर्फी पराभव केला.

यानंतर आयसीसीने वनडे रॅंकिग जाहीर केली आहे.

आयसीसी बॅटिंग रॅंकिग

आयसीसीच्या ताज्या बॅटिंग रॅंकिगनुसार विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना आपलं स्थान कायम ठेवण्यात यश आलं आहे.

Image result for rohit virat

विराट आणि रोहित अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर कायम आहेत.

रॉस टेलरची चौथ्या क्रमांकावर झेप

आयसीसीच्या बॅटिंगमध्ये  रॅंकिगमध्ये न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू रॉस टेलरला एका स्थानाचा फायदा झाला आहे.

Image

रॉस टेलरने पाचव्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. रॉस टेलरचे एकूण ८२८ रेटिंग्स आहेत.

रॉस टेलरने टीम इंडियाच्या विरुद्ध दमदार कामगिरी केली होती. टीम इंडिया विरुद्धच्या तीन वनडे सामन्यात रॉस टेलरने एकूण 194  धावा केल्या होत्या. यात एक नाबाद अर्धशतक आणि शतकाचा समावेश आहे.

तर दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकला २ स्थानांचा फायदा झाला आहे. डी कॉकने ९ व्या स्थानावरुन ७ व्या स्थानावर झेप घेतली आहे. डी कॉकचे एकूण ७८२ इतकी रेटिंग आहे.

आयसीसी बॉलिंग रॅंकिग

बॉलिंग रॅकिंगमध्ये जस्प्रीत बुमराहला पहिलं स्थान कायम ठेवण्यास अपयश आले आहे. बुमराहची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये बुमराहला विशेष अशी कामगिरी करता आली नाही.

बुमराहला न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये एकही विकेट घेता आली नाही.

ताज्या आकडेवारीनुसार बुमराह एकूण ७१९ पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ट्रेंट बोल्ट पहिल्या क्रमांकावर

न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने बुमराहला पछाडत पहिला क्रमांक पटकावला आहे.

Image result for trent boult

ट्रेंट बोल्टचे एकूण ७२७ रेटिंग्स पॉइंट्स आहेत. बुमराह आणि बोल्टच्या रॅंकिग पॉइंट्समध्ये ८ अंकाचा फरक आहे.

बॉलिंग रॅंकिगमध्ये बुमराहचा अपवाद वगळता एकही इंडियाच्या बॉलर्सचा टॉप-१० मध्ये समावेश नाही. मात्र न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरिजमध्ये युझवेंद्र चहलने बॉलिंगने चांगली कामगिरी केली.

टीम इंडियाकडून वनडे सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याची कामगिरी चहलने केली. चहलने एकूण ६ विकेट घेतल्या होत्या.

या कामगिरीचा चहलला फायदा झाला आहे. चहल १३ व्या क्रमांकावर पोहचला आहे.

ऑलराऊंडर्स रॅंकिग

टीम इंडियाच्या सर जडेजा म्हणजेच रविंद्र जडेजाला तीन स्थानांचा फायदा झाला आहे. रविंद्र जडेजाने थेट १० व्या क्रमांकावरुन ७ व्या क्रमांकावर उडी घेतली आहे.

Image result for ravindra jadeja

जडेजाने नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये अष्टपैलू कामगिरी केली.

रविंद्र जडेजाने बॅटिंग करताना दुसऱ्या वनडेमध्ये नाबाद अर्धशतकी खेळी केली होती. तर तिसऱ्या वनडेत ८ धावा केल्या. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेमध्ये प्रत्येकी १ विकेट घेतला होता.

आयसीसीच्या आकडेवारीनुसार रविंद्र जडेजाचे एकूण २४६ रॅंकिंग पॉइंट्स आहेत.

दरम्यान वनडे नंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध २ कसोटी सामन्याची सीरिज खेळणार आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *