Mon. Aug 8th, 2022

NZvsIND, 2nd test : सर रविंद्र जडेजाचा वन हॅंडेड भन्नाट कॅच

रविंद्र जडेजा आपल्या दमदार फिल्डिंगसाठी ओळखला जातो. त्याची प्रचिती आज पुन्हा आली. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्याच ख्राईस्टचर्च येथे दुसरी टेस्ट सुरु आहे.

या दुसऱ्या टेस्टच्या न्यूझीलंडच्या बॅटिंगदरम्यान रविंद्र जडेजाने भन्नाट एकहाती कॅच घेतला आहे.

मोहम्मद शमीच्या बॉलिंगनवर रविंद्र जडेजाने हवेत झेप घेत वँगरची कॅच पकडली.

निल वॅंगर आणि कायल जेमिसन या जोडीने नवव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली.

दरम्यान किवींचा पहिला डाव २३५ धावांवर आटोपला. यामुळे टीम इंडियाला दुसऱ्या डावात ७ धावांची नाममात्र आघाडी मिळाली.

दुसऱ्या डावामध्ये खेळायला आलेल्या टीम इंडियाची चांगली सुरुवात झाली नाही. टीम इंडियाने दुसऱ्या डावात ६ विकेटस गमावले आहेत. टीम इंडियाची कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ६ विकेट गमावून ९० धावा अशी स्थिती आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाकडे ९७ धावांची आघाडी होती. तसेच मैदानावर हनुमा विहारी आणि ऋषभ पंत खेळत आहे.

दुसरी कसोटी अगदी निर्णायक स्थितीत आली आहे. त्यामुळे दुसरी कसोटी निकाली निघणार हे नक्की आहे.

त्यामुळे टीम इंडिया दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडते की न्यूझीलंड सामना जिंकून टीम इंडियाला व्हॉईटवॉश देते, याकडे क्रिकेटप्रेमींच लक्ष असणार आहे.

धावफळक

टीम इंडिया, पहिली इनिंग – २४२/१०

न्यूझीलंड, पहिली इनिंग – २३५/१०

टीम इंडिया, दुसरी इनिंग – ९०/६*

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.