Tue. Oct 26th, 2021

झायरा वसीमच्या निर्णयावर रवीना टंडनची संतप्त प्रतिक्रिया !

राष्ट्रीय पुरस्कार विजेती आणि ‘दंगल’फेम अभिनेत्री झायरा वसीमने अचानक बॉलिवूडमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आणि याची सर्वत्र चर्चा होवू लागली. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेती आणि ‘दंगल’फेम अभिनेत्री झायरा वसीमने अचानक बॉलिवूडमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आणि याची सर्वत्र चर्चा होवू लागली.

दरम्यान झायराने घेतलेल्या या निर्णयावर बॉलिवूडच्या कलाकारांनीही आपली प्रतिक्रीया देण्यास सुरुवात केली असून प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनने झायराने घेतलेल्या या निर्णयावरुन तिला चांगलेच खडेबोल सुनावले असून झायराच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाली रवीना टंडन?

झायराने रविवारी सोशल मिडीयावर भावनिक पोस्ट टाकत बॉलीवूडला अलवीदा करण्याची घोषणा केली. त्यावरुन रवीना टंडनेही ट्विट करुन तिची प्रतिक्रीया दिली.

“इंडस्ट्रीत एखाद-दुसरा चित्रपट केलेल्यांना इंडस्ट्री सोडायची असल्यास त्यांनी ती खुशाल सोडावी. जे लोक इंडस्ट्रीने सर्व काही देऊनही त्याबद्दल कृतज्ञतेचे दोन शब्दही बोलत नसले तरी काही फरक पडत नाही.

परंतु इंडस्ट्रीमधून बाहेर पडताना तिचा मान राखत अदबीनं बाहेर पडावं उलट्या मार्गाने चालण्याचा आपला विचार स्वत:पर्यंतच मर्यादीत ठेवावा आणि अशा लोकांनी शांततापूर्वक इथून निघून जावे” असे रविनाने म्हटलं आहे.

“धर्माच्या नावावर बॉलिवूड सोडण्याचा निर्णय मूर्खपणाचा असल्याचेही तिने म्हटले आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *