Thu. Jul 9th, 2020

रायन इंटरनॅशनल शाळेतील अणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस; 10 वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाची जबर मारहान

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

गुरुग्राममधल्या रायन स्कुलमध्ये प्रद्युम्न नावाच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण कोर्टात सुरु असतानाच लुधियानातल्या रायन स्कुलमध्ये विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली.

 

शाळेतल्या शिक्षकाने 10 वर्षांच्या विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केली. रायन इंटरनॅशनल स्कुलमध्ये हा प्रकार घडल्यामुळे पालक आता संतप्त झाले आहेत.

 

शाळेच्या जवळून हायटेंशन वायर गेल्याची तक्रार मी केली होती त्यामुळेच माझ्या मुलाला वारंवार टॉर्चर करण्यात येत होतं आणि त्यातूनच प्रिन्सीपल आणि शिक्षकांनी ही मारहाण केली असा आऱोप पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला.

 

तर दुसरीकडे शाळा प्रशासनाने हे आरोप फेटाळलेयत. आणि शाळेला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान आहे असा आरोपही त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *