Mon. May 17th, 2021

IPL 2019: बंगळुरुची कोलकातावर 10 धावांनी मात

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला दुसऱ्या विजयाची नोंद करण्यात यश मिळाले आहे. कोलकाता नाईट रायडर्सला घरच्या मैदानातच 10 धावांनी मात करत बंगळुरुने विजय मिळवला आहे. यामध्ये 214 धावांच आव्हान बंगळुरुने कोलकातासमोर ठेवलं. यामध्ये एकट्या कोहलीचे ५८ बॉलमध्ये १०० धावा काढल्या आहेत.कोलकाताकडून नीतीश राणा आणि आंद्रे रसेलनं फटकेबाजी करत डाव सावरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. कोलकाताचा संघानं आव्हानाचा पाठलाग करताना 5  बाद 203  धावा केल्या.

विराटची जबरदस्त खेळी

कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकनं नाणेफक जिंकूत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

बंगरुळुच्या खेळाची सुरूवात अत्यंत संथ गतीने झाली.

विराटसोबत ओपनिंगला आलेला पार्थिव पटेल11  रनांवर नरेनच्या बॉलिंगवर बाद झाला.

परंतु एकट्या कोहलीचे 58  बॉलमध्ये 100  धावा काढून कोलकाताला तगड आव्हान दिलं

विराट नंतर मोईन अलीने देखील 28 बॉलमध्ये 66  धावा काढत विराटला हातभार लावला.

214  धावांचं आव्हान बंगळुरुने कोलकातासमोर ठेवलं.

कोलकाताचा घरच्या मैदानात पराभव

बंगळुरुने 214  धावांचं आव्हान कोलकातासमोर ठेवलं.

कोलकाताचा सलामीवीर ख्रिस लीन 1 धावावर बाद तंबूत परतला.

सलामीवीर ख्रिस लिन, सुनील नरिन आणि शुभमन गिल हे फलंदाज विशेष कामगिरी करू शकले नाहीत.

रॉबिन उथप्पाही लगेचच माघारी परलता.

नीतीश राणा 85  आणि आंद्रे रसेलनं65  फटकेबाजी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

कोलकाताच्या संघानं आव्हानाचा पाठलाग करताना 5  बाद 203  धावा केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *