Tue. Oct 26th, 2021

कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देणं हा सत्तेचा माज – राज ठाकरे

विधानसभा निवडणूक दोन दिवसांवर असून उद्या प्रचार थंडावणार. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष प्रचार करण्यासाठी सज्ज झाली आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा कोथरूडमध्ये सभा घेत सरकारवर घणाघाती टीका केली आहे. कोथरूडकरांवर बाहेरचे उमेदवार लादले असल्याने तुम्हाला गृहीत धरले आहे. तुमच्यावर कुठलाही उमेदवार लादला तरी निवडून देतील असे गृहीत धरले असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये निवडणूक का लढवली नाही ? कोल्हापूरात पूर आला तेव्हा तिथून एक माणूस वाहत आल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे ?

कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे हा सत्तेचा माज असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

उमेदवारी देताना जाती पातीचा विचार केला जातो.

महाराष्ट्राने देशाला पुरोगामी विचार दिला तिथे जाती पातीचा विचार रुजतो आहे.

महापुरुषांना, साहित्यिकांना, कलाकारांना जातीच्या नजरेतून बघायला लागलो आहोत.

उमेदवार कुठल्या जातीचा असल्याचा विचार न करता हाकेला ओ देणारा आहे की नाही हे बघावं असे राज ठाकरे म्हणाले आहे.

त्यामुळे आमदार कोथरूडचा हा जो कायम हाकेला कायम धावून येईल.

पुणे वाहन उद्योगाचं देशातील मुख्य केंद्र असून या ठिकाणी मंदीचं भीषण सावट आहे.

उद्योगधंदे बंड पडत असल्यामुळे बेकारांची संख्या वाढली असून परिस्थिती अजून भीषण होईल.

पुण्यातील बाणेर परिसरात लोकांना गाडी पार्क करू देत नाही कारण खासदार ट्रॅफिकमध्ये अडकले होते.

रोज पुणेकर ट्रॅफिकमध्ये अडकतो त्याचं काय ? असा सवाल उपस्थित केला आहे.

एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असून दुसरीकडे शहरी भागात बॅंका बुडत आहेत.

वाहनं पार्क करण्यासाठी पुणेकरांकडे जागा नाही आहे.

मंत्री लाल गाडीने फिरणार भोग तुम्हाला भोगावे लागणार आहेत.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *