Wed. Oct 5th, 2022

‘मलिकांच्या जावयाची पुन्हा चौकशी करा’ – मोहित कंबोज

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राजकारणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच, भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आरोप केले आहेत. नवाब मलिकांवरील कारवाईत दहशतवाद्यांसोबत असणारे संबंध उघड होतील. तसेच आता मलिकांच्या जावयाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे.

ईडीच्या चौकशीत नवाब मलिकांचे दहशतवाद्यंसोबत असणारे संबंध उघड होणार असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे. ते म्हणाले, नवाब मलिक यांच्या जावयाची पुन्हा चौकशी करावी. आपल्याला देशाविरोधात कारवाई करणारे नेते हवे आहेत का? तसेच कोणताही पक्ष, नेता देशापेक्षा मोठा असू शकतो का? असे सवालही मोहित कंबोज यांनी उपस्थित केले आहेत.

नवाब मलिकांनी ३००० कोटींची संपत्ती भ्रष्टाचार करून मिळवली असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या जावयाची पुन्हा चौकशी करावी तसेच मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांवार कारवाई करण्याची मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.