Sun. Jun 16th, 2019

गडचिरोलीत चार मतदान केंद्रावर आज फेरमतदान

16Shares

गडचिरोली येथे आज एटापल्ली तालुक्यातील वटेली, गर्देवाडा, पुस्कोटी, वांगेतुरी या चार मतदार केंद्रावरती फेरमतदान होत आहे. 11 एप्रिल रोजी नक्षली कारवाईमुळे या केंद्रावरचं मतदान थांबविण्यात आलं होत. याठिकाणी भूसुरुंग व आयडी स्फोट घडवण्यात आले असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे हे मतदान आज सकाळी 7 पासून दुपारी 3 पर्यंत हे मतदान होणार आहे.या अगोदर झालेल्या नक्षली हल्ल्यामुळे फेरमतदानावेळी या मतदान केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

त्या चार मतदार केंद्रावर आज मतदान

गडचिरोलीतील वटेली, गर्देवाडा, पुस्कोटी, वांगेतुरी या चार मतदान केंद्रावर आज मतदान होत आहे.

११ एप्रिल रोजी भूसुरुंग व आयडी स्फोट घडवण्यात आले होते.

माओवाद्यांनी निवडणुकांवर बहिष्कार घाला असे आवाहन केले होते यामुळे हे स्फोट घडवले होते.

या नक्षली हल्ल्यात गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफचे जवान जखमी झाले होते.

नक्षलवादी कारवाया आणि सुरक्षेच्या कारणास्तव या केंद्रावरचं मतदान रोखण्यात आले होते.

सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी 3 पर्यंत हे मतदान होणार आहे.

या फेरमतदानावेळी या मतदान केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

16Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *