Fri. Aug 12th, 2022

नितेश राणेंच्या जामिनानंतर राणे कुटुंबाकडून प्रतिक्रिया, म्हणाले…

भाजप आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. संतोष परब हल्ल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना दिलासा दिला आहे. ३० हजारांच्या जातमुचलक्यावर नितेश राणेंना जामीन मंजूर झाला आहे.

नितेश राणे यांच्या जामिनानंतर राणे कुटुंबाकडून प्रतिक्रिया आली आहे. भाजपचे माजी खासदार निलेश राणे म्हणाले, न्यायालयाने नितेश राणे यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आनंद वाटत आहे. याप्रकरणी काय काय घडले यावर बोलण्याची वेळ नसून आज आनंदाचा दिवस आहे. तसेच ते म्हणाले, सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही, हे आज कळले आहे. दरम्यान, बाकी गोष्टी वेळ आल्यावर बोलू, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, यादरम्यान त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर आज नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असून त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

1 thought on “नितेश राणेंच्या जामिनानंतर राणे कुटुंबाकडून प्रतिक्रिया, म्हणाले…

  1. Respect for this post, I will add up this internet site to my rss feeds, my roommate just recounted me about this as of recent. gracias

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.