Sat. May 25th, 2019

आता WhatsAppवर दिसणार नाही ब्लू टिक, जाणून घ्या ‘ही’ ट्रीक

58Shares

लोकप्रिय अॅप WhatsApp नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणि अपडेट घेऊन येत असतो.

त्यासोबतच सध्या WhatsAppने दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलण्यासाठी व्हिडिओ कॉल आणि चॅटिंग संदर्भात बदल केले आहेत.

मात्र आता WhatsAppनं आयफोन धारकांसाठी चॅटिंग संदर्भात झकास ट्रिक आणली असून आता WhatsAppवर ब्लू टिक दिसणार नसल्याची माहिती दिली आहे.

WhatsAppवर आलेला एखादा मेसेज आपण वाचल्यानंतर पाठवलेल्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीने मेसेज पाहिला आहे की नाही याबाबत समजते. मात्र आयफोन युजर्स आता यापासून वाचणार आहेत.

कशी दिसणार नाही ब्लू टिक ?

आयफोनच्या नवीन मॉडेल्समधील 3-D टच असणारे स्मार्टफोन बाजारात खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

त्याचसोबत स्क्रिनवर थोडे जोरात दाबल्यावर तुमच्यासमोर काही नवीन ऑप्शनस तुम्हाला दिसतील.

त्यामध्येच तुम्हाला WhatsAppचे ऑप्शन दिसून येईल.

या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर प्रेस आणि होल्ड केल्यावर व्हॉट्सॅप फूल स्क्रिन प्रिव्हू घेतो.

या ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला आलेले मेसेज एकत्र वाचता येणार आहेत.

त्यामुळे ज्या व्यक्तीने तुम्हाला मेसेज पाठवला आहे त्याला ब्लू टिक दिसणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *