Tue. May 21st, 2019

कबुतराच्या अंड्यांचं ऑम्लेट आणि आत्महत्या… ‘ही’ आहे खरी कहाणी!

0Shares

कबूतरांच्या अंड्याचं ऑम्लेट करुन खाणं एका तरुणाच्या जिवावर बेतलं आहे. अर्णब मुखोपाध्याय असं मृत तरुणाचं नाव आहे. पुण्यातल्या लोहगाव मध्ये ही घटना घडलीय.

लोहगाव येथील गीनी बेनेला सोसायटीच्या आठव्या मजल्यावर अर्णब मुखोपाध्याय हा छत्तीस वर्षांचा युवक राहायचा. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास कीचनच्या बाल्कनीतून पडून अर्णबचा मृत्यू झाला. त्यानंतर अनेक प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या.

 

संबंधित बातमी- कबुतराच्या अंड्याचं ऑम्लेट खाल्ल्यावर ‘त्याची’ आत्महत्या!

 

अर्णबने कबुतरांच्या अंड्याचं ऑम्लेट खाल्लं आणि आत्महत्या केली,

तो दारुच्या नशेत होता, मानसिक दृष्ट्या आजारी होता,

अंडी खाल्ल्यानंतर तो चाकू घेऊन बायकोच्या मागे लागला,

शर्ट काढून फॅनवर फेकून दिला,

कबुतराचं भूत माझ्या अंगात आलं असं बरळलायला लागला…

अशा एक ना अनेक चर्चा सुरु झाल्या. वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे…

नेमकं काय घडलं होतं?

अर्णब दारुच्या नशेत होता.त्यानं कबुतरांच्या अंड्याचं ऑम्लेट करुन खाल्लं आणि त्यानं चाकू घेतला होता. हे वगळता बाकी सर्व खोटं असल्याचं पोलीस म्हणतायेत. अर्णब मंगळवारी रात्री घरी आला तेंव्हा तो दारुच्या नशेत होता. घरी आल्यावर तो पुन्हा दारु प्यायला. घरात कोणी नॉनव्हेज खात नाही पण अर्णब खायचा. मंगळवारी देखील त्याला अंडी खायची होती. पण घरात अंडी नव्हती. आणि रात्रीचे साडे दहा वाजले असल्यानं पत्नीने अंडी आणण्यास नकार दिला.

त्यावर अर्णबने किचनच्या गॅलरीत असलेल्या कबुतरांच्या घरट्यातून आठ अंडी काढली. त्याचं ऑम्लेट करुन खाल्लं. मात्र अंडी काढल्यानं कबुतरांचा गोंधळ सुरु झाला. त्यांना हकलण्यासाठी अर्णब त्यांच्या मागे चाकू घेऊन लागला. एकदा त्याच्या बायकोनं चाकू घेऊन त्याला थांबवलंही. मात्र, कबुतरांचा गोंधळ पुन्हा सुरु झाला आणि अर्णब पुन्हा त्यांना हकलायला गेला आणि तोल जाऊन कोसळला.

अर्णब मुखोपाध्याय मुळचा कोलकात्याचा होता…व्होडाफोन कंपनीत बॅक ऑफीसला काम करायचा. कुटुंबिय त्याचा मृतदेह गावी घेऊन गेलेत. पोलीस तपासात या घटनेची आणखी माहिती पुढं येईल. मात्र,कबुतरांची अंडी अर्णबच्या जीवावर बेतलीयत असंच आता तरी दिसतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *