Thu. Aug 22nd, 2019

बालाकोट हल्ल्यात खरंच ३०० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला का?-सॅम पित्रोदा

154Shares

14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील जैशच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात 300 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती समोर आली होती. मात्र विरोधकांनी तसेच अनेक लोकांनी या हल्ल्याचा पुरावा मागितला होता. आता पुन्हा एकदा या हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात खरंच 300 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता का ? असा प्रश्न इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी विचारला आहे.

काय म्हणाले सॅम पित्रोदा ?

भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवर सॅम पित्रोदा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

भारतीय हवाई दलामे केलेल्या हल्ल्याची माहिती मी न्यूयॉर्क टाइम्स आणि इतर वर्तमानपत्रात वाचले.

वर्तमानपत्र वाचल्यानंतर भारताने खरंच हल्ला केला का ?

तसेच या हल्ल्यात 300 दहशतवादी मारले गेले का ?

जर हल्ला करण्यात आला आहे, मग भारतीयांना याचा पुरावा द्यावा असे सॅम पित्रोदा यांनी म्हटलं आहे.

तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनी कोणीही ठार झाले नसल्याचे म्हटलं आहे.

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेले एअर स्ट्राइक ही कारवाई करण्याची पद्धत चुकीची असल्याचे ते म्हणाले.

यापूर्वीही भारतावर दहशतवादी हल्ले झाले आहेत.

मुंबईतही हल्ला झाला होता. तेव्हा देखील आपण विमाने पाठवू शकत होतो. मात्र मला हे पटत नसल्याचे पित्रोदा यांनी सांगितलं.

 

154Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *