Tue. Apr 23rd, 2019

उपवासाचा हा खास स्टीम ढोकला…

0Shares

साहित्य :-

शिंगाडा पीठ – 1 कप

दही – 1 ½ चमचा

हिरव्या मिरच्यांची पेस्ट – ¼ चमचा

सैंधव मीठ – ½ चमचा

एनो – 1 ½ चमचा

तेल – 1 ½ चमचा

पाणी – ½ कप

कृती :-

प्रथम शिंगाड्याचं पीठ घ्या. त्यात दही आणि पाणी घाला. नंतर हिरवी मिरचीची पेस्ट त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करणे.

हे मिश्रण कमीत कमी 4 तास ठेवा.

नंतर त्या पिठात 1 ½ चमचा इनो घाला.

एका कढईत पाणी आणि नंतर तेल टाकून गरम करा. नंतर त्यात मिक्स केलेले मिश्रण घाला.

हे मिश्रण एकत्रित करून ते शिजवून घ्या.

शिजवलेले मिश्रण एका प्लेटवर घाला आणि 15 मिनिटे वाफ काढा.

गरमा गरम स्टीम ढोकला चटणीबरोबर (सॉस) सर्व्ह करावे.          

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *