Wed. Oct 27th, 2021

चटणी पळवणार कोरोनाला?

कोरोनावर चटणीचा उतारा?

लाल मुंग्यांची चटणी हा सर्वसामान्यांच्या आहाराचा नियमित भाग नाही. पण देशाच्या अनेक आदिवासी भागांमध्ये औषध म्हणून लाल मुंग्यांची चटणी खाल्ली जाते. मात्र या चटणीमध्ये कोविड-19 प्रतिबंधक औषधं आहेत का याची चाचपणी सुरू आहेत. कोविड-19 वर उपचारासाठी लाल मुंग्यांच्या चटणीचा प्रस्ताव तयार करण्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी ओदिशा उच्च न्यायालयाने आयुष मंत्रालय आणि सीएसआयआरच्या महासंचालकांना तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.

ओदिशा, छत्तीसगढ या राज्यांमध्ये लाल मुंग्या आणि हिरव्या मिरच्या यांची चटणी केली जाते. फ्लू, खोकला, सर्दी, श्वसनाच्या समस्या, थकवा आणि इतर आजारांवर उपचार म्हणून ही चटणी खाल्ली जाते. ही बाब लक्षात घेऊन बारीपाडामधले नयाधर पधियाल या इंजीनियरने त्याचा वापर कोविडवरील उपचारासाठी करता येईल का अशी विचारणा करणारी याचिका ओदिशा उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आयुष मंत्रालय आणि सीएसआयआरच्या महासंचालकांना तसा अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *