चिखलदऱ्याच्या स्काय वाँकला केंद्राचा रेड सिग्नल

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यात होणाऱ्या जगातील तिसऱ्या आणि भारतातील पहिल्या स्काय वाँकला केंद्रानी रेड सिग्नल दिला आहे. ज्या परिसरात स्काय वाँक बनतोय तो व्याघ्र अधिवसाचा भाग आहे. त्या परिसरात घनदाट जंगल असून वन्य प्राण्यांचा अधिवास आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उच्च दर्जाचे संवर्धन आणि संरक्षनाची आवश्यकता आहे. नॅशनल आणि स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफला प्रस्ताव सादर करण्याचं केंद्र सरकारच्या पत्रात नमूद केलं आहे. ‘इकोलॉजीकल अभ्यास करा त्या प्रोजेक्ट्चा आणि त्याचा त्यावर काही परिणाम होते का, त्या प्रोजेक्टचा वाईल्ड लाईफवर काही परिणाम होतो का, हे ही तपासा’ असही केंद्र सरकारच्या पत्रात नमूद केलं गेलं आहे.आता यावर सिडको लवकरच तज्ञांची निवड करून त्यांच्याकडून अहवाल घेऊन परत प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती मिळाली आहे.