अ‍ॅमेझॉनकडून माऊथवॉशऐवजी मिळाला रेडमी नोट 10

मुंबई: मुंबईतील एका व्यक्तीने अ‍ॅमेझॉनकडे माऊथवॉशसाठी ऑनलाईन ऑर्डर दिली होती. मात्र माऊथवॉशऐवजी या व्यक्तीला रेडमी नोट 10 हा मोबाईल मिळाला आहे. लोकेश डागा असं या व्यक्तीचं नाव असून लोकेश यांनी ट्विटरवर याबाबतचे ट्विट केले आहे आणि आपल्या ट्विटमध्ये या दोन्ही कंपन्यांना टॅग केले आहे.

लोकेश यांनी १० मे रोजी चार कोलगेट माउथवॉशच्या बाटल्या मागितल्या होत्या ज्याची किंमत ३९६ रुपये इतकी होती. परंतु,ऑर्डर डिलिव्हरीमध्ये त्यांना १३ हजार रुपयांचा रेडमी नोट १० मिळाला आहे, असं लोकेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

उपभोग्य उत्पादनाचा परतावा प्रतिबंधित आहे आणि अ‍ॅपद्वारे परताव्याची विनंती करण्यास अक्षम आहे,असे लिहीत लोकेश यांनी ऑर्डरचे तपशील आणि मिळालेल्या स्मार्टफोनचा फोटो शेअर केला आहे.

Exit mobile version