Mon. Jan 17th, 2022

#AbhinandanVartaman: अभिनंदच्या वडिलांच्या आयुष्यात घडला नकोसा योगायोग

दक्षिणेतील दिग्गज चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांना हवाई दलातून निवृत्त झालेल्या एका उच्चाधिकाऱ्याने चित्रपटासाठी एक सत्यघटना सुचवली.

कारगिल युद्धात पाकिस्तानी हद्दीत मिग कोसळल्याने भारताचा एक जवान युद्धबंदी झाला त्याची ही गोष्ट होती.

आणि त्याच गोष्टीची पुनरावृत्ती त्याच अधिकाऱ्याच्या खऱ्या आयुष्यात घडत आहे.

आज त्याचाच वीरपुत्र मिग विमान कोसळल्यानं शत्रूच्या ताब्यात आहे.

शांततेच्या काळातील सर्वोच्च सेवेबद्दलच्या परम विशिष्ट सेवापदकाने गौरविले गेलेले एअर मार्शल सिंहकुट्टी वर्थमान यांचा पुत्र विंग कमांडर अभिनंदन बुधवारी पाकिस्तानच्या कैदेत जखडला.

पहाटे 6 वाजून 20 मिनिटांनी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जन. आसिफ गफूर यांनी अभिनंदन याच्या अटकेची बातमी ट्विटद्वारे जाहीर केली आणि देशभर ती पसरली.

मणिरत्नम यांच्या ‘कात्रू वेलीयीदाइ’ या तामिळ चित्रपटासाठी सिंहकुट्टी सल्लागार होते.

या चित्रपटाची कथा आणि सिंहकुट्टी यांच्या मुलासोबत घडलेली घटना अगदी सारखीच आहे.

या चित्रपटात भारतीय हवाई दलाचे स्क्वाड्रन लीडर वरुण चक्रपाणी कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानच्या कैदेत जखडले जातात.

सिंहकुट्टी यांच्या जीवनातील हा योगायोग मनाला चटका लावून जाणारा आहे.

अभिनंदन यांना सुखरुप भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे अथक प्रयत्न सुरू आहेत.

अभिनंदन यांना कोणतीही इजा झाली नाही पाहिजे, अशा सक्त शब्दांत केंद्राने इस्लामाबादला सांगितले असून पाकिस्तानी लष्करानेही त्यांच्याशी योग्य वर्तणूक करण्याची हमी दिल्याचे सांगितले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *