Sun. Oct 24th, 2021

नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टारांना मा’रहा.ण; नातेवाईक आक्रमक

मुंबईच्या नायर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी तीन निवासी डॉक्टारांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी तीन निवासी डॉक्टारांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाण केल्याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस स्थानकात नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

नेमकं काय घडलं ?

मुंबईच्या नायर रुग्णालयात 41 वर्षीय रुग्णाला दाखल करण्यात आले होते.

या रुग्णाला क्षय रोग झाला होता तर त्याच्या उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

संसर्गजन्य आजारही होण्यास सुरुवात झाली होती.

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच रुग्णाची अवस्था बिकट असल्याचे डॉक्टारांनी सांगितले होेते.

रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांनी तीन निवासी डॉक्टरांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली.

त्याचबरोबर या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली असून त्यांना रोखण्यासाठी गेलेल्या सुरक्षारक्षकावर हल्ला करण्यात आला.

सहकारी डॉक्टरांच्या सहाय्याने या निवासी डॉक्टारांना बाहेर काढण्यात यश मिळाले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *