Fri. Apr 19th, 2019

‘जिओ दिवाली धमाका’

0Shares

टेलिकॉम इंडस्ट्रीत सर्व मोबाईल कंपन्याची ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी आणि इतर कंपन्यांना मागे टाकण्यासाठी स्पर्धेा रंगली आहे. या स्पर्धेत सर्वात मोठी उडी टाकलेल्या रिलायन्स जिओ कंपनीने मोठी कमाई केली आहे. आपले प्लान आॅफर देऊन ग्राहकांना खुश ठेवत ही कमाई मिळवली आहे.

दिवाळीनंतर रिलायन्स एक धमाकेदार प्लान घेवून आले आहेत. सध्या मोफत कॉलिंग आणि फ्री डाटा देण्याच्या या युद्धात, सर्व मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकाला सर्वोत्तम आणि ग्राहकांच्या खिशाला कमीत कमी धक्का लागेल, असा प्लान ऑफर करीत आहेत.

जाणून घ्या प्लान –

 • फक्त हा प्लान जिओच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
 • कंपनीने या प्लानला ‘जिओ दिवाली धमाका’ नाव दिलं आहे.
 • यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, जिओ आपल्या यूझर्सला 100 टक्के कॅशबॅक ऑफर देखील देणार आहे.

अट – वर्षभरासाठी हा प्लान आपण घेतला तर वर्षभराचे पैसे कॅशबॅकमध्ये दिले जाऊ शकतात.

काय आहे नेमका प्लान –

 • JIO च्या या प्लानची किंमत 1699 रूपये
 • प्लानची मुदत 1 वर्ष
 • एका वर्षासाठी जिओ युझर्सला मोफत कॉलिंग आणि फ्री डाटा
 • या प्लानमध्ये युझर्सला दररोज दीड जीबी डाटा देण्यात येईल.
 • यानुसार वर्षभर एकूण 547.5GB डाटा मिळेल.

अशी मिळणार 100 टक्के कॅशबॅक ऑफर –

 • प्लानवरील कॅशबॅक ऑफर रिलायन्स डिजिटल कूपन्सच्या स्वरूपात मिळणार
 • हे कूपन्स युझर्स माय जिओ अॅपच्या माध्यमातून वापरू शकतात.
 • हे कूपन आपोआप युझर्सच्या अॅपमध्ये सेव्ह होईल.
 • याचा उपयोग तुम्ही पुन्हा रिचार्जसाठी करू शकतात.
 • कॅशबॅकच्या स्वरूपात मिळणारे हे कूपन्स 31 डिसेंबर 2018 पर्यंत वापरावे
 • या कॅशबॅकचा वापर तुम्ही रिलायन्स डिजिटलच्या स्टोअरवर देखील करू शकतात.
 • पण यासाठी युझर्सला कमीत कमी 5 हजार रूपयांपर्यंतची खरेदी करावी लागणार आहे.

मोबाईलच्या कोणत्याही प्लानची एकदा स्वत: माहिती काढा, आणि त्यानंतरच रिचार्ज करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *