समीर वानखेडेंच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर धर्म मुस्लीम; मलिकांनी सादर केली कागदपत्रे

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक याचे एनसीबीचे विभागीय संचलाक समीर वानखेडे यांच्यावर आरोपसत्र सुरूच आहे. आता समीर वानखेडे यांच्या धर्मावरून तेढ निर्माण झाला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा सेंट पॉल, सेंट जोसेफ शाळेचा दाखला न्यायालयात सादर केला आहे. त्या शाळेच्या कागदपत्रांवर समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असून मुस्लिम धर्माची नोंद केली आहे. त्यामुळे आता मलिकांना यावरून समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे.
समीर वानखेडे यांच्या शाळेचा दाखला मलिकांनी सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. समीर वानखेडेंच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर ते मुस्लिम असल्याचे स्पष्ट होत आहे. नवाब मलिकांनी ही कागदपत्रे न्यायालयात सादर केली असून आता समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
समीर वानखेडेंच्या शाळा सोडल्याचा दाखल्यावर मुस्लिम धर्म असल्यामुळे हळूहळू फर्जीवाडा समोर येत असल्याचे मलिकांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तसेच वानखेडेंकडून मानहानीचा दावाही मलिकांनी केला आहे. वानखेडेंच्या शाळेच्या दाखल्यावर मुस्लिम धर्म असल्यामुळे आता वानखेडेंच्या अडचणीत वाढ झाली असून चौकशीनंतर समीर वानखेडेंची नोकरी जाईल असे मलिकांनी सांगितले आहे.
नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र ट्विटरवर शेअर केले होते. तसेच त्यांचे नाव समीर दाऊद वानखेडे असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर जातप्रमाणपत्राबाबत केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.