Sun. Jun 13th, 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यात धार्मिक स्थळं दिवाळीनंतर सुरु करणार

मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत धार्मिक स्थळं दिवाळीनंतर सुरू होतील…

राज्यातील कोरोनाच्या संकटामुळे धार्मिक स्थळं ही बंद आहे मात्र यासंदर्भात राज्यसरकारने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं दिवाळीनंतर सुरु करणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतं असल्यानं  राज्यात अनलॉक तसेच मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. 
मात्र मंदिरं, धार्मिक स्थळं कधी सुरु करणार असा प्रश्न हा अनेकांना पडत आहे. यासंदर्भात भाजपा आणि मनसेने राज्य सरकारला वारंवार सवाल केले होता.

आता दिवाळीनंतर धार्मिक स्थळं उघडली जातील असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सर्वतोपरी काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. धार्मिक स्थळं आणि मंदिर सुरू करा असं सर्वसामान्यच मत होत यालाच लक्षात घेता मंदिरे आणि धार्मिक स्थळं दिवाळीनंतर सुरू होतील असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *