Tue. Sep 17th, 2019

सलमानच्या प्रेमाखातर ‘भारत’ पाहण्यासाठी चाहत्याने केलं संपूर्ण थिएटर बुक

0Shares

रमजान ईदला सर्वांच्या भेटीला येणारा सलमान खानचा ‘भारत’ हा चित्रपट 5 जून रोजी प्रदर्शित होत आहे.तरी नाशिकमधल्या त्याचा एका चाहत्याने ‘भारत’ चित्रपट एकट्याला बघता यावा म्हणून चक्क संपूर्ण थिएटरच बुक केलं आहे.

सलमानच्या चाहत्याच हटके काम ?

अभिनेता सलमान खान याचा ‘भारत’ हा चित्रपट 5 जून रोजी प्रदर्शित होत आहे.या चित्रपटाचे प्रोमोज बघून चाहत्यामध्येच अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे.

सलमानवरील प्रेमासाठी चाहते बरचं काही करत असतात. नाशिकमधल्या एका चाहत्याने ‘भारत’ चित्रपट एकट्याला बघता यावा म्हणून चक्क संपूर्ण थिएटरच बुक केलं आहे.

आशिष सिंघल असं या चाहत्याच नाव आहे.या चित्रपटात सलमान तरुणापासून साठ वर्ष वयाच्या वयस्कर व्यक्तीपर्यंतच्या पाच वेगवेगळ्या भूमिका सादर करणार आहे.

तसेच या चित्रपटात सलमान खान सोबत कॅटरिना कॅफ, तब्बू, दिशा पटाणी, सुनील ग्रोवर आणि जॅकी श्रॉफ असणार आहेत.

या चित्रपटाची गाणी ही लोकप्रिय होत आहेत.आता सर्वांचे लक्ष हे ‘भारत’ हा बॉक्स ऑफिसवर किती गल्ला गोळा करतोय याकडे लागले आहे.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *