Tue. Sep 28th, 2021

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोदींनी केले ‘हे’ ट्विट…  

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 93 वी जयंती आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटवरून बाळासाहेब हे नेहमीच लोकाच्यां कल्याणाचं कार्य करायचे अशी भावना व्यक्त केली आहे.

बाळासाहेब  खूपच धाडसी आणि शुर होते. बाळासाहेबांनी कायम जनतेच्या हिताची काम केली असून ते लोकांच्या हक्कासाठी लढले आहेत.

बाळासाहेब बुद्धीमान तर होतेच मात्र त्यांच्याकडे थोडक्याच शब्दात मह्त्वपूर्ण बोलण्याचे कौशल्यही होते. ते एक उत्तम वक्ते होते. बाळासाहेब आपल्या खरखरीत भाषणाने जनतेला आपलसं करत असतं.

पंतप्रधान मोदींबरोबरच इतरही अनेक नेत्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला असून बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ट्विट त्यांना करुन आदरांजली अर्पण केली आहे.

तर पाहुयात कोण काय म्हणाले आहेत बाळासाहेबांबद्दल…

सुरेश प्रभू : ते एक उत्तम व्यगंचिञकार आणि निडर नेते होते.

धनंजय मुंडे: शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

प्रफुल्ल पटेल : बाळासाहेब एक उत्तम व्यगंचिञकार होते.जनतेच्या हृद्यात त्यांच एक आगळ- वेगळ स्थान आहे.

अशोक पंडित (सिनेनिर्माता): बाळासाहेब ठाकरे हे कायम माझे प्रेरणास्थान आहेत.

अनिल शितोळे: बाळासाहेब जनतेचे नेते होते.ते नेहमीच जनकल्याणासाठी लढले आहेत.

देवेंद्र फडणवीस: हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे आमचे प्रेरणास्थान, श्रद्धास्थान आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *