नाव बदलची सुरुवात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती. त्यांनी अलाहाबादचं नाव प्रयागराज आणि फैजाबादचं नाव अयोध्या केलं. त्यानंतर औरंगाबाद आणि उस्मानाबाद पाठोपाठ पुणे जिल्ह्याचं नाव बदलण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली. पुणे जिल्ह्याचं नाव जिजापूर करण्याची मागणी केली. यासाठी संभाजी ब्रिगेडनं राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे.
‘पुणे शहराला जिजाऊंचा वसा आणि वारसा आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘छत्रपतींचा’ आर्शिवाद घेतला. तेव्हा आर्शिवादाला जागावे आणि पुणे शहराच्या नावात बदल करावा.’ अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली आहे. यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देणार असल्याची माहिती देखील शिंदे यांनी दिली.