Fri. Sep 20th, 2019

Renault ची नवी Triber भारतात लाँच, किंमत 4.95 लाखांपासून सुरू

0Shares

Renault Triber  ही कॉम्पॅक्ट एमपीव्ही (मल्टी पर्पज व्हेइकल) कार आज लाँच झाली आहे. पेट्रोल इंजिन प्रकारातील ही कार बाजारात उतरवण्यात आली आहे. ही कार 7 सीटर असूनही इतर सात सीटर कारपेक्षा स्वस्त असल्याचा दावा केला जातोय. Renault Triber  किंमत 4.95 लाख ते 6.49 लाख रुपयांदरम्यान आहे. सध्या या कारची चार व्हेरिअंट्स आहेत.  17 ऑगस्टपासून या कारच्या बुकिंगसाठी सुरूवात झाली  होती. अखेर आज ही कार लाँच झाली आहे.

रेनो ट्रायबरचं वैशिष्ट्य

आकर्षक डिझाइन आणि ऐसपैस जागा हे या कारचं वैशिष्ट्य आहे.

चार मीटरपेक्षा कमी जागेत ही गाडी ऐसपैस लगेज स्पेस देण्याचा दावा करते. रेनो ट्रायबर ऐसपैस जागा उपलब्ध करून देते.

यामध्ये पुढच्या सीटवर सर्वोत्तम कपल डिस्टन्स (710 एमएम)चे आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या रांगेतील लेग रूम (200 एमएमपर्यंत) व तिसऱ्या रांगेतील लेग-रूम (91 एमएम)चा आहे.

सोबतच त्यात 12 व्ही चार्जिंग सॉकेटस आहेत.

यामध्ये उंच प्रवासीदेखील अगदी आरामात दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेमधील सीटवर बसू शकतात. याची रूफ हाईट (834 एमएम) आहे.

रेनो ट्रायबरमध्ये स्लायडिंग, रिक्लायनेबल, फोल्डेबल आणि टम्बल सेकंड-रो सीट्ससोबत मोठे दरवाजे आहेत.

यामधील पहिल्यांदाच वापरण्यात आलेल्या इजीफिक्स सीट्स हाताळण्यास सोप्या असून तिसऱ्या रांगेतील स्वतंत्र सीट काढता येते.

रेनो ट्रायबरमध्ये एकूण 100 पेक्षा अधिक वेगवेगळी सीट-कॉन्फिगरेशन उपलब्ध आहेत.

रेनो ट्रायबरमध्ये सर्वोत्तम स्टोरेज कम्पार्टमेन्ट उपलब्ध आहे (31 लिटर्सपर्यंत) तर सर्वोत्तम बूट क्षमता (625 लिटर्स) पाच सीटसाठी उपलब्ध आहे.

सहा जणांकरिता बूट क्षमता 320 लिटर्स तर सात व्यक्तींसाठी 84 लिटर्सची राहील.

वैशिष्टयं –

एकूण 100 पेक्षा अधिक विविध सीट-कॉन्फिगरेशन्स, इझीफिक्स सीट्स यंत्रणा

चार एम चं प्रशस्त केबिन, 625 एल बूट स्पेस आणि 31 एल पर्यंतची अंतर्गत स्टोरेज स्पेस

20.32 सेमी (8-इंच) मल्टीमीडिया टच स्क्रीन

1.0 लिटरचे पेट्रोल इंजिन, कमी वाहन देखभाल खर्च

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *