Tue. Dec 7th, 2021

प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा कोकणकड्यावरून पडून मृत्यू

रॅपलिंग करताना हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्यावरून पडून प्रसिद्ध गिर्यारोहक अरूण सावंत यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचं वय 60 वर्षं होतं. अरूण सावंत यांच्यासह एकूण 30 जण हरिश्चंद्रगडावर रॅपलिंगसाठी आले होते. सावंत हे 18 जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास बेपत्ता झाले होते. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता. आज त्यांचा मृतदेह बचाव पथकाला सापडला.

गोरेगावमधील नामवंत गिर्यारोहक, सह्याद्रीची घोरपड म्हणून ओळखले जाणारे अरुण सावंत यांचा काल, हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्यावरील मोहिमेत अपघाती मृत्यू झाला. या मोहिमेत 30 जण सहभागी झाले होते. सावंत हे मोहिमेचे प्रमुख होते. रोप फिक्सिंग करताना अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांचा मृतदेह सापडला असून, दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कोण होते अरुण सावंत?

महाराष्ट्रातला सर्वात जुने आणि अनुभवी ट्रेकर

ड्युक्स नोज लोणावळाची मोहीम यशस्वी करणारे पहिले गिर्यारोहक

सह्याद्रीतल्या सर्वाधिक लोकप्रिय ठरत असलेल्या ट्रेकिंगच्या जागा सांधण व्हॅली, कोकणकडा रॅपलिंग, थिटबी वॉटरफॉल रॅपलिंग सारख्या जागा शोधणारे अवलिया गिर्यारोहक

गेली 40 वर्ष सह्याद्रीमध्ये प्रचंड भटकंती केलेला गिर्यारोहक

अनेक वाटा शोधल्या,अनेक कड्यांवर आजही अरूण सावंत यांनी केलेल्या बोल्टींगच्या आधारावरच गिर्यारोहक चढाई करतात.

काय घडलं?

रॅपलिंगचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण होत आला होता.

इतर 29 जण हे टप्पा उतरूनही आले होते.

सावंत हे दोराच्या साह्यानं रॅपलिंग करत असताना, बेपत्ता झाले.

तेव्हापासून त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता.

स्थानिक आणि इतर ट्रेकर्सच्या मदतीनं शोध घेण्यात येत होता.

आज अखेर त्यांचा मृतदेह सापडला.

तो बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

घटनास्थळी टोकावडे पोलिस, वालिव्हरे येथील ग्रामस्थ रघुनाथ  खाकर सर, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *