Wed. May 22nd, 2019

वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवारी भाडयाने?

29Shares

सध्या वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची क्रेझ आहे.त्यात हल्ली तर रस्त्यावर वाढदिवसाचा केक कापण्यासाठी चक्क तलवारींचा वापर केला जात आहे.‘मुळशी पॅटर्न’मधील या प्रयोगानंतर हा प्रकार आता सर्वत्र होत आहे.यातूनच सोलापुरात वाढदिवसाचा केक कापण्यासाठी चक्क तलवारी भाडय़ाने देण्याचा उद्योग सोलापुरात सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. सोलापुर पोलीसांनी वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवारी भाडय़ाने देण्याचा धंदा करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. दोन महिन्यांपूर्वी शहरातील जुन्या एम्प्लॉयमेंट चौकाजवळ भर रस्त्यावर रात्री वाहतुकीला अडथळा आणत काही तरुण वाढदिवसाचा केक कापताना चक्क तलवारी हातात घेऊन नाचत होते.पण अशाप्रकारे तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सोलापुरात तिघांना अटक

सोलापुर शहरातील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात तिघे एका पोत्यातून तलवारी घेवून निघाल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचला.

शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिघा संशयिताना दोन तलवारीसहित ताब्यात घेतले. वाढदिवसाचा केक कापण्यासाठी आपण इतर तरुणांना तलवारी भाडय़ाने देतो, अशी माहीती संशयितांनी दिली

तलवारी भाडय़ाने देण्यासाठी आम्ही घेऊन चाललो होतो, अशी कबुली तिघा संशयितांनी पोलिसांना दिली.

सागर संतोष गुजले, गेनसिद्ध सिद्धाराम चाबूकस्वार व सचिन शरणप्पा कोळी (तिघे रा. सोलापूर) अशी या तिघांची नावे आहेत.

या तिघा जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *