Sun. Sep 22nd, 2019

‘या’ 8 धोकादायक पुलांची होणार दुरुस्ती!

15Shares

लवकरच मुंबई महापालिका मुंबईतील धोकादायक पुलांची दुरुस्ती करणार आहे. धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचा निर्णय पालिकेने घेतला असून शहरातील महत्त्वाच्या आठ पुलांची मोठी दुरुस्ती यामध्ये करण्यात येणार आहे. या आठ पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं. त्यानंतर या पुलांच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महापालिका सुमारे 17 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.

महाडमधील सावित्री पूल आणि त्यानंतर अंधेरीतील गोखलेपुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

त्यामुळे महापालिकेच्या हद्दीतील पुलांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता.

त्यानुसार मुंबईतील महत्वाच्या आणि जुन्या पुलाचे सर्वेक्षण महापालिकेने केले.

यात मुंबईतील 344 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते.

यानंतर मुंबईतील एकूण  223 पुलांच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे.

तर 176 पुलांच्या किरकोळ दुरुस्तीचे कामही सुरु आहे.

यामध्ये 47 पुलांची दुरुस्ती तातडीने हाती घेण्यात आली आहे.

तर सगळ्यात प्रथम या  धोकादायक पुलंच्या दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आला आहे.

 

या पुलांची होणार दुरुस्ती

महालक्ष्मी येथील रेल्वेवरील उड्डाणपूल

करी रोड स्टेशन उड्डाणपूल

शीव स्टेशन येथील रेल्वेवरील उड्डाणपूल

सायन हॉस्पिटल धारावी येथील रेल्वेवरील उड्डाणपूल

दादर येथील रेल्वेवरील टिळक उड्डाणपूल

दादर फुलमार्केटजवळील पादचारी पूल

माहीम फाटक येथील पादचारी पूल

धारावी येथील दादर धारावी नाल्यावरील पादचारी पूल

वाहतुकीची अडचण

या पुलांच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून सुरु करण्यात येणार आहेत. त्यातच दादरच्या टिळक ब्रिज हा सर्वात जुना पूल असल्याने त्याच्याही दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाईल. पण विशेष म्हणजे ज्यावेळी या पुलाची दुरुस्ती केली जाईल त्यावेळी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.

15Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *