Sat. Oct 1st, 2022

अनिल परब द्यायचे बदलीच्या याद्या; ओएसडी रवी व्हटकर यांचा ईडीकडे जबाब

राज्यातील पोलिसांच्या बदल्यांसाठी शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात गुप्त बैठका व्हायच्या, असा धक्कादायक खुलासा अनिल देशमुख यांच्या विशेष कार्य अधिकारी रवी व्हटकर यांनी केला आहे. रवी व्हटकर यांनी सक्तवसुली संचालनालयाकडे दिलेल्या जबाबात अनिल परबांकडे बोट दाखवल्यामुळे अनिल परबांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अनिल देशमुख यांच्या गृहमंत्री असल्याच्या काळात पोलीस बदल्यांबाबत ईडीने देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविले. या जबाबात रवी व्हटकर म्हणाले, अनिल देशमुख आणि अनिल परब गुप्तपणे पोलीस आयुक्तांना भेटीला बोलवायचे. तसेच परब आणि देशमुख यांच्या आयुक्तांबरोबरच्या गुप्त बैठकीत बदल्यांवर चर्चा व्हायची तर या बैठकांना मी आणि संजीव पलांडे हजर असायचो, अशी माहिती रवी व्हटकर यांनी दिली आहे.

तसेच राज्यातील मंत्री, आमदार आणि पक्षांचे नेते हे देशमुख यांच्याकडे त्यांच्याकडील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची नावे पाठवत. राष्ट्रवाई आणि काँग्रेसकडून आलेल्या याद्या माझ्याकडे यायच्या तर शिवसेनेकडील याद्या अनिल परब आणून द्यायचे, असेही व्हटकर जबाबात म्हटले आहेत.

1 thought on “अनिल परब द्यायचे बदलीच्या याद्या; ओएसडी रवी व्हटकर यांचा ईडीकडे जबाब

  1. Thank you for another great article. Where else could anyone get that kind of information in such a perfect way of writing? I have a presentation next week, and I am on the look for such information.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.