Sun. Oct 17th, 2021

रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी कपात; गृहकर्ज, वाहनकर्ज स्वस्त होण्याची शक्यता

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (RBI) रेपो दरात पुन्हा एकदा 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे 6.00 टक्क्यांवरून आता रेपो दर 5.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. RBI च्या या निर्णयामुळे गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  त्याचबरोबर कर्जाचा हफ्ता कमी होणार असल्याचे समजते आहे. विशेष म्हणजे RBI ने ऑनलाईन व्यवहारवरील NEFT चार्जेस हटवल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

RBIचा मोठा निर्णय –

रेपो दरात सलग तिसऱ्यांदा 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे.

रेपो दरात कपाच केल्यामुळे सामान्य नागरिकांना याचा फायदा होतो.

तसेच व्याजदर कपात असल्यामुळे बॅंकांवरही व्याजदर कपाती करण्यात येईल.

तसेच गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर कर्जाचा हफ्ताही कमी होणार आहे.

गृहकर्जासह वाहन कर्जावरही याचा परिणाम दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *