Wed. Jun 16th, 2021

उकाड्याने त्रस्त मुंबईकर हवामान बदलामुळे सुखावला

तापदायक ऊन्हाच्या तडाख्यानंतर आता वातावरणात झालेल्या बदलामुळे मुंबईकर आता सुखावला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असून, शनिवारी १८ अंश नोंदविण्यात आलेले किमान तापमान रविवारी १७ अंश नोंदविण्यात आले आहे.

परिणामी रात्री आणि पहाटे वातावरणातील गारठा वाढल्याने मुंबईकरांना थंडीचा अनुभव येत आहे. तापमानात जसजशी घट होईल; तशीतशी थंडी आणखी वाढणार आहे.

हिवाळा सुरू झाल्याने मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांवर स्वेटर विक्रेत्यांनी गर्दी केली आहे.

हवामान खात्याचा अंदाज – 

मागील २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. १० आणि १२ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. १३ डिसेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. १० आणि १२ डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१, १७ अंशांच्या आसपास राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *