Fri. Sep 30th, 2022

दारूची दुकानं उघडण्याची आमदाराकडे विनंती ; व्हिडिओ व्हायरल

कोरोनामुळे संपूर्ण राज्यात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही टाळेबंदी जाहीर केली आहे. या टाळेबंदीदरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि औषधांची दुकाने सोडलं तर सगळीच दुकाने काटेकोरपणे बंद आहेत. या टाळेबंदीमुळे दररोज दारु पिणाऱ्या तळीरामांना झाला आहे.

मात्र एका वयस्कर इसमाने दारुची दुकानं उघडण्याची मागणी केली आहे. या इसमाने व्हिडिओद्वारे आमदाराकडे दारुची दुकानं सुरु ठेवण्याची मागणी केली आहे. हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. हा सर्व प्रकार परभणीतील आहे.

वाईन शॉप २ तास सुरु ठेवा, मुख्यमंत्र्यांकडे विनंती

नक्की प्रकार काय ?

परभणीतील जिंतूरात सामान्यांना सकाळी 7 ते 11 या वेळेत भाजीपाला आणण्यासाठी संचारबंदी शिथिल करण्यात येतेय. मात्र नागरिकांनी खरेदी करण्यासाठी बाजारात एकच गर्दी केली. यामुळे जिंतूरच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर रस्त्यावर उतरल्या होत्या. नागरिकांनी गर्दी करूनये असे आवाहन करत होत्या. यावेळेस रस्त्यावर एक मजेदार घटना घडली.

एक वयस्कर तेथे त्यांच्या जवळ आले. देशी दारूची दुकान उघडा अशी मागणी त्यांनी केली. वयस्करांची मागणी ऐकताच आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासह जमा असलेल्या लोकांचा हसू अनावर झाला. पूर्ण घटनेचा एका युवकाने आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ तयार केला. सध्या व्हीडिओ जिल्ह्यात बराच व्हायरल होतोय.

Lockdown | दारुड्यांचा बिअर बारवर डल्ला, पण फोडला नाही गल्ला

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.