Sun. Aug 1st, 2021

राजीनामा का राष्ट्रीय पातळीवर जाण्याची शिडी ? – संजय निरूपम

कॉंग्रेस पक्षात सध्या राजीनाम्याचे सत्र सुरू असून मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी अवघ्या चार महिन्यात अध्यक्ष पदावरून राजीनामा दिला आहे. कॉंग्रेस नेते संजय निरूपम यांनी देवरा यांच्या राजीनाम्यावरून टीका केली आहे. राजीनामा देण्यात त्यागाची भावाना असते, मात्र वरच्या पातळीवर जाण्याची शिडी ? अशा कर्मठ लोकांपासून पक्षाने सावध राहवे असे म्हटलं आहे.

काय म्हणाले संजय निरूपम ?

मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मिलिंद देवरा यांना मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदी नेमण्यात आले होते.

मात्र चार महिन्यातच देवरा यांनी राजीनामा दिल्यामुळे अनेकांनी टीका केली आहे.

तसेच त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे चर्चा होत असल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.

कॉंग्रेस नेते संजय निरूपम यांनी देवरांचे नाव न घेता टीका केली आहे.

हा राजीनामा आहे की, वरच्या पातळीवर जाण्याची शिडी? अशा कर्मठ लोकांपासून सावध राहवे असेही म्हटलं आहे.

राजीनाम्यात त्यागाची भावाना अंतर्भुत असते, मात्र राष्ट्रीय पातळीवरील पद मागितले जात आहे असल्याची टीका करण्यात आली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *