Wed. Jun 29th, 2022

जरंडेश्वर कारखाना शेतकऱ्यांना परत द्या; सोमय्यांची ईडीकडे मागणी

जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. किरीट सोमय्या जरंडेश्वर साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी शेतकऱ्यांसह घेऊन ईडी कार्यालयात दाखल झाले. यावेळी, जरंडेश्वर कारखाना शेतकऱ्यांना परत द्या, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी ईडीकडे केली आहे.

जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ‘जरंडेश्वर कारखाना माझा नाही तर हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे, आणि त्यांना हा कारखाना परत देऊन आदर्श घडवा’, असे आवाहन सोमय्यांनी अजित पवारांना केले आहे.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी सक्तवसुली संचालनायलाकडे केली आहे. जरंडेश्वर कारखान्यात घोटाळ्याप्रकरणी ईडीने ज्याची मालमत्ता जप्त केली होती, त्याला न्यायालयाने मान्यता दिली आहे. तसेच आता भारत सरकारने आणि ईडीने हा जरंडेश्वर साखर कारखाना पुन्हा शेतकऱ्यांना परत द्या, अशी मागणी सोमय्यांनी ईडीकडे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.