Sat. Oct 1st, 2022

उत्तर प्रदेशात योगी सरकारची वापसी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून भाजप पक्ष आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप २५५, सपा ११६, बसपा ३, काँग्रेस २, आणि इतर २७ जागांवर आघाडीवर आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात पुन्हा योगी सरकारची वापसी पाहण्यात मिळत आहे.

उत्तर प्रदेशात दुसऱ्यांदा भाजपची सत्ता येणार असून एकाच पक्षाला सदतीस वर्षांनी दुसऱ्यांदा संधी मिळणार आहे. २०१७नंतर आता २०२२मध्ये भाजप पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार बनवत आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील एकूण ५ जागांपैकी भाजपा चार जागांवर आघाडींवर आहे. तर सपा एका जागेवर आघाडीवर आहे.

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ का जिंकले?

भाजपचे विकास आणि हिंदुत्वाचे आक्रमक राजकारण.

सुशासन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात यश.

पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेचा फायदा.

मायावतींचा छुपा पाठिंबा.

भाजपाची संघटनात्मक बांधणी.

सायकल पंक्चर का झाली?

प्रचारात दिसलेला उत्साह मतदानात दिसला नाही.

सपाला मित्रपक्षांनीच मदत केली नाही.

सपाचे मतदार भाजपाकडे सरकले.

मुसलमान आणि दलित मतदारांत भाजपाची घुसखोरी.

भाजपच्या नियोजनबध्द रणनीतीसमोर अखिलेश निष्प्रभ.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.