Tue. May 18th, 2021

स्वर्ग दर्शन देणारे ‘पाताल लोक’

शशांक पाटील : कोरोनाच्या संकटात गेलेल्या २०२० या वर्षांत सिनेमाजगतात मोठ्या उलाढाली होऊ शकल्या नसल्या तरी बऱ्याच दर्जेदार वेब सिरीज आपल्या भेटीला आल्या यातीलच एक म्हणजे ‘पाताल लोक’. अँमेझाँन प्राईमवर प्रदर्शित झालेली अवघी नऊ एपिसोड असणारी ही वेबसिरीज सुरुवातीपासूनच सतत उत्कंठा वाढवणारी अशी आहे.

भारतात सॅक्रेड गेम्सने वेब सिरीजना एका उंचीवर नेत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली ज्याला मिर्झापूर, असूर, क्रिमिनल जस्टीस अशा एक न अनेक वेब सिरीजने मदत केली. दरम्यान पाताल लोकने देखील तो दर्जा कायम ठेवत कोणत्याही मोठ्या स्टार कास्ट शिवाय घवघवीत यश प्राप्त केलं. तर या सिरीजमध्ये दिल्लीतील क्राईम, भारतीय क्राईममध्ये मीडिया, राजकारणी आणि पोलिस यांचा रोल याशिवाय श्वानप्रेम या एका सुंदर विषयाला हात घातला आहे. कथेनंतर जर स्टारकास्ट पाहिली, तर अवघे एक ते दोन डायलॉग असणाऱ्या अभिषेक बॅनर्जी याच काम अत्यंत अप्रतिम आहे असं म्हणन काही वावगं ठरणार नाही. विशेष म्हणजे कोणताही डायलाँग न बोलता, अगदी कमी काळ स्क्रिनवर राहून देखील प्रेक्षकांच्या मनात घर करता येऊ शकतं, हे अभिषेक बॅनर्जी अर्थात कथेतील हातोडा त्यागी याने दाखवून दिला. सुरुवातीला कथेचा एक पार्ट असणाऱ्या त्यागीने शेवटी कशी संपूर्ण कहाणीच स्वत:भोवती गुंडाळून घेतली हे खरंच पाहण्याजोग आहे.

विशेष म्हणजे त्यागीच नाही तर कथेतील प्रत्येक कॅरेक्टर हे त्याच्या जागी अगदी परफेक्ट बसलंय. मग ते इनेस्पक्टर हाथीराम चौधरीचे प्रमुख कॅरेक्टर निभावणारा जयदीप अहलवाट असो किंवा चित्रकुटमध्ये निष्पाप बळी गेलेला रिक्शावाला. सर्वांनीच अगदी वाखनण्याजोगी भूमिका पार पाडल्याने या सिरीजला चार-चाँद लागले आहेत. विशेष म्हणजे या कथेतून माणसाचे खरे मित्र असणाऱ्या श्वानांवर आपण प्रेम केलं तर जिवंतपणी स्वर्ग प्राप्ती होईल असाच काहीसा संदेश दिग्दर्शक देऊ इच्छितो. तर हा नेमका संदेश कसा दिला आहे हे समजण्यासाठी सिरीज नक्की पाहा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *