Wed. Jan 19th, 2022

नागपूर विभागीय आयुक्तांकडून ऑक्सिजन प्रकल्पांचा आढावा

कोरोनाचा ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच भारतातील कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेत उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. नागपूरचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन प्लांटच्या प्रकल्पाचा आढावा घेतला आहे. तसेच येत्या दहा दिवसांत ऑक्सिजन प्लांटचे प्रलंबित काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोनाचा नवा विषाणू आमिओक्रॉनचे संकट घोंगावू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. धूळ खात पडलेल्या ऑक्सिजन यंत्रणेकडे प्रशासनाचे आता लक्ष गेले असून यंत्रणा सुस्थितीत आणण्याची गडबड दिसून येत आहे. तसेच राज्यात ऑक्सिजन पुरावठ्याची बोंब उडाली आहे. राज्यातील २८३ ऑक्सिजन प्रकल्प अपूर्ण असल्याचे माध्यमांच्या तपासणीत समोर आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना नागपूरमध्ये ऑक्सिजनचे १५ जम्बो प्लांट लावण्याचे काम सुरू झाले मात्र अद्यापही एकही काम पूर्णत्वास आले नसल्याची माहिती समोर आली.

त्यामुळे एम्समध्ये बसविण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटची पाहणी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तसेच नागपूरमधील प्रलंबित ऑक्सिजन प्लांट येत्या १० दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे आदेश नागपूरचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *