Mon. Dec 16th, 2019

राहुल गांधींच्या गळ्यात लवकरच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी या वर्षातच काँग्रेसचे सर्वेसर्वा म्हणजे काँग्रेस अध्यक्ष बनणार असल्याची जय महाराष्ट्रला सूत्रांनी माहिती दिली. सोनिया गांधी स्वतःहूनच ऑक्टोबरमध्ये उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची सुत्रे देणार असल्याची माहिती मिळाली.

 

राहुल गांधीना काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्याचा निर्णय येत्या एक दोन दिवसातच होऊ शकतो अशीही शक्यता दिल्लीतील राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. राहुल गांधी हे गांधी-नेहरू घराण्याशी संबंधित असल्यामुळेच त्यांची अध्यक्षपदाची उमेदवारी सर्वाधिक सशक्त मानली जात आहे.

 

 

काँग्रेसची सुत्र सध्या अप्रत्यक्षरित्या राहुल गांधींकडेच असल्याची माहिती सुद्धा जय महाराष्ट्रला मिळाली. यासाठी काँग्रेसकडून संघटन बांधणीला सुरुवात झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *