असा आहे आर्चीच्या आगामी सिनेमा ‘कागर’चा टीझर

सध्या सगळीकडे निवडणुकींचं माहौल पाहायला मिळतोय. याचाच काहीसा परिणाम सिनेसृष्टीवरही झाला आहे्. यातच या महिन्यामध्ये ‘सैराट’ फेम आर्ची एका नव्या सिनेमातून रसिकांना भेटायला येणार आहे. ती अशाच एका राजकारणाच्या विषयावर आधारित  सिनेमामध्ये लीड रोल मध्ये दिसणार आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीची आणि राजकारणात प्रवेश केल्यानंतरची एक मुलगी आणि तिच्या आयुष्यात येणा-या कलाटणीला दर्शवणारा या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. साधारण १ मिनिट २१ सेकंद असलेल्या टीझरने या सिनेमाची उत्सुकता अजूनच वाढवली आहे.

कसा आहे ‘कागर’ ?

‘सैराट’ मधल्या रिंकू राजगुरू म्हणजेच आर्ची या व्यक्तिरेखेचा प्रभाव आजही रसिकप्रेक्षकांच्या मनावर आहे.

त्या सिनेमाची धूम अजूनही तरूणांमध्ये आहे.

अशाच काहीशा धडाडी मुलीचा रोल रिंकू या आगामी सिनेमामध्ये करत आहे.

या सिनेमामध्ये बहरत जाणा-या एका मुलीची प्रेमकथा आणि सोबतच राजकारणातला प्रवेश यांच्याभोवती या सिनेमाची कथा फिरते.

रिंकू राजगुरू आणि शुभंकर तावडे हे दोघे मुख्य भुमिकेमध्ये दिसणार आहेत. अगदी कमी वेळातच या सिनेमाचा टीझर लोकांच्या पसंतीला पडला आहे.

‘कागर’चा टीझर पाहताना ‘सैराट’ सिनेमाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.तशाच कणखर मुलीच्या भुमिकेमध्ये ती दिसतेय.

त्यातही दाखवलेलं मुख्य पात्र हे धडाडी आणि रोखठोक दाखवलं होतं.

या सिनेमाचा टीझर पाहताना आर्चीची छटा तिच्या याही रोलमध्ये पाहायला मिळेल.

या सिनेमामध्ये प्रियकरावर अत्यंत प्रेम करणारी एक मुलगी आणि त्याच्या मृत्यूनंतर तिच्या राजकीय प्रवासाला होणारा प्रवास यातला बदल यामध्ये पाहायला मिळणार आहे.

 

Exit mobile version