Mon. May 23rd, 2022

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

 देशात कोरोनाग्रस्त परिस्थिती काही प्रमाणात स्थिरावली आहे. अशातच भारताने शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. मात्र दुसरीकडे इंधनदरवाढीने मोठी झेप घेतली आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे.

 देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी उच्चांक पातळी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत ११३.४६ इतकी आहे तर डिझेलची किंमत १०४.३८ इतकी आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत ११३.१२ आहे तर डिझेलची किंमत १०२.१५ इतकी आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलची किंमत ११५.०४ इतकी आहे तर डिझेलची किंमत १०५.९५ इतकी आहे. नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत ११३.४७ इतकी आहे तर डिझेलची किंमत १०२.७४ इतकी आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलची किंमत ११३.५२ आहे तर डिझेलचा दर १०२.१३ इतका आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत १०७.५९ आहे तर डिझेलची किंमत ९६.६२ इतकी आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत १०४.५२ आहे तर डिझेलचा दर १००.५९ इतका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.