Fri. Sep 20th, 2019

कॅन्सरवर मात करुन Bollywood अभिनेते ऋषी कपूर मायदेशी

0Shares

कॅन्सर (Cancer) सारख्या मोठ्या रोगावर मात करून बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) अमेरिकेतून भारतात परतले आहेत. गेल्या वर्षापासून ऋषी कपूर अमेरिकेतील न्यूयॉर्क (New York) मध्ये कॅन्सरवर उपचार घेत होते.

मुंबईच्या एअरपोर्टवर पत्नी नीतू कपूर यांच्यासोबत ते उतरले. परत मायदेशी परतण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

मीडियाला समोर बघताच दोघांनीही स्मितहास्य केले.

त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यच सांगत होते की ते किती मोठ्या परिस्थितीला झुंज देऊन आले आहेत.

‘मी 11 महिने 11 दिवसांनंतर घरी परत आलो आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे आभार.’ असं Tweet त्यांनी केलंय.

ऋषी कपूर यांनी आपल्या आधीच्या काही Tweets मध्येही पत्नी नीतू कपूरची प्रशंसा केली आहे. नीतू कपूर या कठीण परिस्थितीत आपल्या  पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या असं ऋषी यांनी tweet मध्ये म्हटलंय. ऋषी कपूर भारतात आल्यामुळे त्यांच्याइतकाच आनंद त्यांच्या चाहत्य़ानांही झाला आहे.

पुन्हा ऋषी कपूर सिनेमांत कधी पाहायला मिलणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. तर स्वतः ऋषी कपूर यांनीही आपल्याला पुन्हा सिनेमांत काम करायचंच आहे, असं स्पष्ट केलंय.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *