Jaimaharashtra news

२४ तासांत मुंबईत ७ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ६ हजार ९२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. शहरात आतापर्यंत एकदाही इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आलेले नाहीत. रविवारी दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला. यामुळे शहरातील कोरोना मृतांचा आकडा ११ हजार ६४९ वर पोहोचला.

Exit mobile version