जेनेलिया आणि रितेश देशमुखने रिक्रिएट केला‘जाने तू या जाने ना’या चित्रपटाचा डायलॉग

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख काही काळ चित्रपटांपासून दूर असले तरी सोशल मीडियावरील अनेकवेळा रितेश आणि जेनेलिया हे दोघे व्हिडिओ पोस्ट करत असतात. नुकताच जेनेलिया आणि रितेश नवा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी फार पसंत केलं आहे. जेनेलिया आणि रितेश देशमुख हे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. पोस्ट लिहून, फोटो आणि व्हिडिओ अपलोड करून रितेश आणि जेनेलिया चाहत्यांच्या संपर्कात असतात.
सध्याला चाहत्यांना जेनेलियाचा आणि रितेशचा एक व्हिडिओ आवडलाय. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला जेनेलिया तिच्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसते. यात ती म्हणते, ‘कॉलेज के 5 साल कहां निकल गए पता ही नहीं चला’. त्यावर रितेश म्हणतो, ‘रील्स पे बीटा रील्स पे’. रितेश आणि जेनेलियाचा हा मजेदार व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. त्यावर त्यांनी जोरदार भाष्य केले आहे. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले आहे की, ‘आज कोणतेही जेवण मिळणार नाही’. या व्हिडिओला आतापर्यंत ५ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहे.