Tue. Jun 2nd, 2020

या वक्तव्यावर रितेश देशमुखचं पियुष गोयल यांना सडेतोड उत्तर

26/11 हल्ल्याबद्दल बोलत असताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला विलासराव देशमुख यांची मुलगा रितेश देशमुख यांनी त्यांच्या या टीकेली सडेतोड उत्तर दिले आहे. सोशल मिडीयावर पोस्ट करत त्यांनी त्यांची प्रतिक्रीया पियुष गोयल यांच्यापर्यंत पोहोचवले आहे. ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा चित्रपटात मुलाला काम मिळावं यासाठी धडपडत होते. अशी टीका पियुष गोयल यांनी केली होते.

काय म्हणाले होते पियुष गोयल

26/11 हल्ल्याबद्दल बोलत असताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर टीका केली आहे.

तुम्हाला मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला आठवत असेल त्यावेळी हल्लेखोर तीन दिवस मुंबईत होते.

हा हल्ला होत असताना राज्यात काँग्रेसचे सरकार होते.  यावेळी काँग्रेस सरकाक किती कमजोर आहे हे दिसून आले आहे.

इकडे हल्ला सुरू होता आणि दुसरीकडे हल्ल्यादरम्यान दिवंगत विलासराव देशमुख एका चित्रपटाच्या दिग्दर्शकाला घेऊन ताज हॉटेलमध्ये गेले होते.

त्यांच्या मुलाला काम मिळाव म्हणून ते धडपडत होते. असं ही पियुष गोयल म्हणाले होते.

ते पंजाबमधील लुधियाणा शहरात एका कार्यक्रमात ते बोलत होते.

रितेश देशमुखनं ट्विटरवरून प्रत्युत्तर

पियुष गोयल यांनी विलासराव देशमुख यांच्यावरील टीकेला त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुखनं डेतोड उत्तर दिलं आहे.

ट्विटरवर एक पत्र पोस्ट करत त्यांच्या या टीकेला चांगलच उत्तर दिलं आहे.

माझ्या वडिलांनी मला चित्रपटात काम मिळावे यासाठी कधीच प्रयत्न केले नाहीत.

ते कधीच कुठल्या दिग्दर्शक किंवा निर्मात्याशी बोलले नाहीत. हे मी अभिमानाने सांगतो.

मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही करा.

पण जी व्यक्ती तुमच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी जिवंत नाही, तिच्यावर आरोप करणे चुकीचे आहे.

सर, तुम्ही उशीर केलात. सात वर्षांपूर्वी हे बोलला असता तर नक्की तुम्हाला उत्तर दिल असतं असं ही ते म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *