Sun. Jan 16th, 2022

ट्वेन्टी-ट्वेन्टी : महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी ऋतुराज गायकवाड

  चेन्नई सुपर किंग्ज संघाने यंदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. या संघातील ऋतुराज गायकवाडने यंदाची आयपीएल चांगलीच गाजवली आहे. सर्वाधिक धावा करत ऋतुराज यावेळी ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. तसेच आता येत्या ट्वेन्टी-ट्वेन्टीमध्ये महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे.

  यंदाच्या आयपीएलमध्ये ऋतुराजने चांगली कामगिरी केली आहे. सर्वाधिक धावा करत त्याने ऑरेंज कॅपसुद्धा पटकावली. आणि आता महाराष्ट्र संघाने ऋतुराजकडे कर्णधारपद देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

  येत्या ४ नोव्हेंबरपासून ट्वेन्टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत ऋतुराज गायकवाड महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे ऋतुराजच्या नेतृत्वाकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहेत. जर ऋतुराजने चांगली कामगिरी केली तर ऋतुराजला चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करण्याची संधीही मिळू शकते.

  महाराष्ट्र संघ – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), नौशाद शेख (उपकर्णधार), केदार जाधव, यश नाहर, अझीम काझी, रणजित निकम, मुकेश चौधरी, तरनजीतसिंह, सत्यजित बच्छाव, मनोज इंगळे, शमशु जमा काझी, प्रदीप दाधे, आशा पालकर, दिव्यांग हिंगणेकर, स्वप्नील फुलपगार, सुनील यादव, धनराजसिंह परदेशी, पवन शहा, जगदीश जोप, स्वप्नील गुगळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *