Sun. May 9th, 2021

कोरोनाचा असाही परिणाम, गंगा होतेय शुद्ध

कोरोनामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत. देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेवर त्याचे विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे. मात्र या ही परिस्थितीत काही चांगल्या गोष्टीही घडत आहेत. लॉकडाऊनमुळे गुन्हेगारी कमी झाली आहे. प्रदूषण कमी झालं आहेत. तसाच एक महत्त्वाचा फायदा म्हणजे नद्यांचंही प्रदूषण कमी होऊ लागलं आहे.

गंगा नदीचं भारतीय जनमानसात विशेष महत्त्व आहे. गंगा नदी ही गेल्या काही काळात विलक्षण प्रदूषित झाली होती. पुन्हा गंगेला स्वच्छ करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले गेले. ‘नमामि गंगे’ सारखा प्रयत्नदेखील अपेक्षित यश मिळू शकलं नाही. मात्र देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर गंगेच्या पाण्याची गुणवत्ता ४० ते ५० टक्क्यांनी वाढली असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे.

जलशुद्धीकरणासाठी लॉकडाऊन फायद्याचं ठरलं आहे. लॉकडाऊनमुळे औदयोगिकीकरणाला काही काळासाठी आळा घालण्यात आला आहे. मोठमोठे कारखाने, फॅक्ट्री बंद आहेत. त्यामुळे त्यातून निघणारी रसायनं, खराब पाणी यांसारख्या गोष्टी गंगेच्या पाण्यात सध्या प्रवाहीत होत नाहीत. त्यामुळे गंगेचं पाणी स्वच्छ आहे. त्यात कोणतीही भेसळ होत नाहीय. त्यामुळे लॉकडाऊनचा एकीकडे देशाला तोटा होत असला, तरी प्रदूषणाच्या समस्येवर मात्र उपाय निघाला आहे. गंगेचं तसंच इतर अनेक नद्यांचं शुद्धीकरण होऊ लागलं आहे.

दरम्यान, औद्योगिक वसाहतींमध्ये शुकशुकाट असून याचा परिणाम जलशुद्धीकरण मोहिमेला बळ देणारा ठरला आहे. गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *